चंद्रपूर: सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाच्या वैद्यकीय व मन:चिकित्सक समाजकार्य विभाग ,सहयोगी समुपदेशन केंद्राव्दारे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहनिमित्त मानसिक स्वास्थ सर्वांसाठी अधिक गुंतवणूक, अधिक उपलब्धता या विषयावर जागरूकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
शरीर आणि मन ही मानवी जीवनाची दोन्ही अंगे व्यवस्थित असतील तर, व्यक्ती व्यवस्थित काम करू शकते. घरात, प्रवासात आप्तेष्टांमध्ये वावरतांना ती आत्मविश्वासाने वावरू शकते. मात्र, यापैकी एखाद्या ठिकाणी अडथळा येत असेल तर त्यांच्या मन:स्थितीवर व वर्तनावर तसचे कामावर आणि नातेसंबंधावर परिणाम होतो. सर्वांना आनंदी राहण्याचा अधिकारी आहे हे तत्व जगातील सर्वच समाजांमध्ये व सर्व स्तरांत रूजण्याची आवश्यकता आहे. कोविड १९ च्या संकटकाळात सर्वांना मानसिक समस्या भेडसावत आहे. मानसिक आरोग्याबाबत प्रतिबंध, निदान, उपचार, व संवर्धन याची जागरूकता होणे गरजेचे आहे. या हेतून जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त १० ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान मानसिक आरोग्य जागरूकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शकानी मार्गदर्शन केले. या सप्ताहामध्ये ‘मानसिक स्वास्थ राखु या’ या विषयावर आकाशवाणी वर चर्चा सत्र तसेच सीटीव्ही न्यूज़ , जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व आसमान समुपदेशन केंद्र यांच्या वतीने चर्चासत्र आयोजीत करण्यात आले तसेच मानसिक आरोग्याचे महत्व आणि मानसिकता ,किशोरवयीन मुलींचे जिवन,ऑनलाइन शिक्षण घेताना येणारा तणाव ,गर्भवती महिलांना होणारा मानसिक तणाव व घ्यावयाची काळजी,मानसिक आरोग्य व स्वच्छता,कोवीड 19 व मानसीक समस्या,पोषण आहार, इत्यादी. विविध ठिकाणी मार्गदर्शनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, हा सप्ताह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील साकुरे यांच्या नियंत्रणात व वैद्यकीय मन चिकित्सक विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. जयश्री कापसे व प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह साजरा करण्यात आला. आणि या सप्ताह मध्ये मार्गदर्शक म्हणून डॉ जयश्री कापसे , डॉ किरण देशपांडे , डॉ देवेंद्र बोरकुटे , श्रीमती मुग्धा कानगे, संगीता लोखंडे, प्प्रा. रमेश मेश्राम ( एम. ए. मानसशास्त्र ) , श्री. मदन मुन (school supprotive officer ) ,मेघा चौधरी. Social worker, प्रा. सुहानंद ढोक ( psychology, amravti ), विजयालक्ष्मी बोबळे (GNM) , ज्योतीताई खंडाळे (CS) , केशरिताई कातकर आशा वर्कर ,स्मिता वंढारे (ANM),हुमने मॅडम ( अंगणवाडी सेविका), सुशील करमनकर (आशा वर्कर) ,विनोद चव्हाण , बालाजी जाधव , महेश वाढई , बर्डे मॅडम ANM ,रामटेके मॅडम .सेविका,डाॅ.गिरीधर येङे D.E.M.H. B.E.M.S. M.D.E.H.,नेहा टोगें (GNM) Nagpur, इत्यादी. मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन वैद्यकीय व मन चिकित्सक विभागाचे विद्यार्थी मोहन विलास चुकाबोटलावार, पार्वती घाटे, मंगेश घाटे, प्रगती पाल, अक्षय टेकाम, कल्पना जेउरकर, सीमा सय्यद , मनीषा डुकरे, सुमित रामटेके, पंकज राठोड ,स्वाती टिके, प्राची उमाटे, अक्षय कामिडवार, पंकज जीवतोडे इत्यादी ने केले.
समाजकार्य महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा
Advertisements