ताज्या घडामोडी – देशात गॅस सिलेंडर ची सेवा देणाऱ्या विविध कंपन्या आहेत, त्यामधील एक इंडेन गॅस आहे, इंडेन गॅस कंपनीने देशातील ग्राहकांसाठी गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी एकच नंबर ठेवनार असल्याचे जाहीर केले.
सोमवारी हा नवीन क्रमांक कंपनीने जारी केला, आयव्हीआर व एसएमएस द्वारे गॅस बुकिंगसाठी आधी वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळे क्रमांक होते आता जुन्या क्रमांकावरून ग्राहकांना गॅस सिलेंडर बुक करता येणार नाही, त्यासाठी ग्राहकांना 7718955555 या क्रमांकावर देशभरातील ग्राहकांना गॅस बुकिंग करता येणार आहे.
ग्राहकांच्या रजिस्टर्ड क्रमांकावरून हा नंबर डायल करावा.
ग्राहकांसाठी अजून एक आनंदाची बातमी इंडेन गॅस कंपनीने दिली आहे , आता व्हाट्सएप वरून सुद्धा ग्राहकांना गॅस बुकिंग करता येणार आहे, त्यासाठी आपल्याला रजिस्टर्ड क्रमांकावरून 7588888824 वर व्हाट्सएपद्वारे REFILL टाईप करून पाठवावे लागणार आहे.