भद्रावती/अब्बास अजनी
भद्रावती ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यापूर्वी ते चांगल्या अवस्थेत ठेवण्यासाठी असलेली विजेवर चालणारी शवशितपेटी कित्येक महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत असल्याने मृतदेहाची विटंबना होत आहे. व संबंधित नागरिकांना अडचणी येत आहे. ही समस्या लक्षात घेऊन सदर शवशितपेटी त्वरित दुरुस्त करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा वंचित बहुजन आघाडी तर्फे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांना दि.26 ऑक्टॉम्बर ला देण्यात आलेल्या एका निवेदनातून करण्यात आला आहे. सदर शवपेटी कित्येक दिवसापासून बंद अवस्थेत आहे. मात्र याचा पाठपुरावा येथील अधिकाऱ्यांकडून शासनाकडे करण्यात आला नाही. शवपेटी नसल्याने शवविच्छेदनासाठी आलेले मृतदेह अनेकदा उघड्यावरच पडले असतात अशा वेळी उंदरांनी ते अनेकदा कुरतल्यामुळे मृतदेहाची विटंबना झाली असल्याचा आरोपही करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक सुनील खोब्रागडे, सुशील देवगडे, राहुल चौधरी, सीमा ढेंगळे ,राखी रामटेके, कापूरदास दुपारे, संजय पाटील ,विजय पाटील, ग्यानी चहादे, राजू लाभाणे, विजय इंगोले ,विशाल कांबळे उपस्थीत होते.