अष्टमीचे औचित्य आणि नवदुर्गांचा सत्कार

0
418
Advertisements

चंद्रपूर – शहर महिला शिवसेनेतर्फे अष्टमीला शहरातील नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला.
नवरात्री व कोरोना काळात शहरातील सामाजिक, राजकीय, शासकीय कार्यात आपली सेवा देणाऱ्या नवदुर्गांचा महिला शिवसेनेतर्फे सत्कार हा एक आगळावेगळा उपक्रम होता.
कार्यक्रमात यावेळी महिला आघाडीच्या मनस्वी गिर्हे, महिला शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ भारती दुदानी, उपजिल्हाप्रमुख माया पटले, शहरप्रमुख वर्षा कोठेकर, शोभा वाघमारे उपस्थित होत्या.
शहरातील नवदुर्गा म्हणून शिक्षण क्षेत्रातील प्रा. जयश्री कापसे, डॉक्टर रुपाली जयस्वाल, शिक्षिका प्रतिमा नायडू, परिचारिका रंजना ताई, सफाई कामगार लता ताई, विकलांग सेवा संस्थेच्या प्राजक्ता वासेकर, पोलीस विभागातील गोगाटे ताई, पत्रकार रुपाली धोटे व समाजसेविका भगत ताई यांचा सत्कार करण्यात आला.
सोशल डिस्टनसिंग चे अंतर राखून कार्यक्रमात नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here