चंद्रपूर/गडचिरोली – पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर/गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी लवकर उठवू असे संकेत वारंवार देत आहे परंतु दारूबंदी झाल्यावर जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर येणे म्हणजेचं दारूबंदी ही फेल ठरली असे आहे का?
मग प्रशासन का कठोर कायदे बनवीत नाही? दारू ही आदिवासी जनतेच्या अधोगतीचं मुख्य कारण आहे, आणि महिलांना विश्वासात न घेता हा निर्णय संतापजनक आहे अशी प्रतिक्रिया देवाजी तोफा यांनी दिली आहे.
धानोऱ्यातील तालुका ग्रामसभा महासंघाने मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून दारूबंदी उठविण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे.
मेंढा लेखा आदर्श गावचे जनक देवाजी तोफा यांनी ही दारूबंदी कायम ठेवण्याची मागणी करीत कठोर कायदे करीत प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
गडचिरोली जिल्ह्यात पेसा कायदा लागू असल्याने सरकार म्हणून ग्रामसभेला सर्व अधिकार प्राप्त आहे.
अनुसूचित क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे दारू दुकाने किंवा विक्री करता येत नाही.
त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होते, यावर कठोर कायदे न आणता दारूबंदीच फेल झाली असा गवगवा राजकारणी करीत आहे, लोकांना दारू पाजून सरकार महसूल वाढविणार की महिलांवर अत्याचार अशी प्रतिक्रिया जणमानसात उमटत आहे.
दारूबंदी हटविण्यावरून देवाजींची “तोफ” गडाडली
Advertisements