Advertisements
घुगूस – घुगूस नगरपरिषद न व्हावी यासाठी 6 जणांनी खोटे आक्षेप टाकून त्या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करणाऱ्या पत्रकरांचा महिलांनी पुतळा जाळून निषेध केला.
विजयादशमीला वाईट प्रवृत्तीचे दहन करण्याची प्रथा आहे, परंतु राजकारणात असे अनेक वाईट प्रवृत्ती आजही वावरत आहे.
मागील 27 वर्षांपासून घुगूस नगरपरिषदेसाठी सुरू असलेला नागरिकांचा संघर्ष महाविकास आघाडी सरकार मध्ये पूर्ण झाला परंतु त्यामध्ये बट्टा लावण्याचे काम स्थानिक नेत्यांनी केला असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
खोटे आक्षेप भाजप नेत्याने भूलथापा देऊन टाकायला लावले असे पत्रच जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केल्याने हा विरोध करण्याचा प्रकार समोर आला.
पद जाणार म्हणून भाजप अजून किती थराला जाणार हे तर पुढे कळेलचं.