चंद्रपूरच्या युवकांना लागलं “आयपीएल” चं भूत

0
612
Advertisements

चंद्रपूर – भारतातील लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट, या खेळाचं वेड अनेकांना आहे, प्रत्येक बॉल वर फक्त रोमांच असतो, कोण जिंकणार, कोण सेंच्युरी मारणार यावर साऱ्यांच्या नजरा टिकून असतात.
आधी 50 ओव्हरचा हा खेळ असायचा म्हणजेच आजही सुरू आहे मात्र या खेळाला अजून रोमांचकारी बनवीन्यासाठी बीसीसीआयने ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट सुरू करत आयपीएलची सुरुवात केली.
2008 पासून या खेळाला सुरुवात झाली, प्रत्येक देशातील खेळाडू यामध्ये सहभागी होत असतात, दर्शकांनी मैदान खचखचून भरलेलं.
पण या खेळात कोट्यवधी रुपयांचा सट्टाबाजार सुरू झाला व आजही मोठ्या प्रमाणात सट्टा सुरू आहे.
आयपीएलचं ह्या व्यसनात युवा वर्ग आहारी गेलं आहे, 3 तासात पैसे कमविण्याची संधी म्हणजे आयपीएल.
कोरोनाकाळात आयपीएल सध्या देशाबाहेर म्हणजेच दुबईला खेळल्या जात आहे.
आज आयपीएलचा सट्टा सुद्धा आधुनिक झालं आहे.
किती खाई और किती लगाई हे महत्वाचे शब्द, पण सट्टा लावायचा कसा कुणाजवळ याच उत्तर म्हणजेच पंटर.
पंटर हा बुकी व सट्टा लावणाऱ्याचा मध्यस्थी.
सट्टा लावणाऱ्या व्यक्तींना आयडी व पासवर्ड दिल्या जातो, त्यामध्ये त्यांना प्रत्येक टीमचे रेट, किती कॉइन म्हणजेच पैसे लावायचे, जिंकल्यावर किती पैसे मिळणार याबाबत सर्व माहिती असते.
पंटरला पैसे दिल्यावर तो आपल्या आयडी मध्ये कॉइन ट्रान्सफर करतो, 1 कॉइन म्हणजे 1 रुपया, आणि त्यानंतर सुरू होतो या खेळातील रोमांच.
मात्र या व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक युवक कर्जबाजारी झाले, काहींनी तर आत्महत्या केल्या.
चंद्रपूर शहरात तर अनेक युवक आयपीएलच्या आहारी गेले आहे, कॉलेजचे विद्यार्थी या सट्टा बाजारात सक्रिय आहे, कर्ज काढून युवक खेळात पैसे लावत असतात, हरल्यावर पंटर कडून पैश्याची मागणी केली जाते न दिल्यास आत्महत्येची वेळ अनेक युवकांवर आली.
आज चंद्रपुरातील प्रत्येक गल्लीबोळात युवक मोबाईल पकडून फक्त आयपीएलचे रेट्स व पैसे लावण्याचे काम करीत असतात.
अनेक पंटर आपल्या शहरात सक्रिय आहे पण पोलीस प्रशासनाच्या दूर, त्यांचेवर कारवाई का होत नाही देवच जाणे.
राजकीय , सामाजिक क्षेत्रातील अनेक जणांना या आयपीएलचं भूत लागलं आहे अस म्हणायला हरकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here