शरद पवार विचार मंचचा विस्तार सुरू, सुशिक्षित युवकांना संधी

0
192
Advertisements

चंद्रपूर:  दिनांक 24 ऑक्टोबर रोजी शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपुरची छोटेखानी बैठक 11 वाजता बालाजी वॉर्ड इथे पार पडली .सदर बैठक शरद पवार विचार मंचचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अमित ढमाळ, प्रदेश उपाध्यक्ष श्री शशिकांत देशकर यांच्या मार्गदर्शनात ,शरद पवार विचार मंचचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री निमेश मानकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आली . सुशिक्षित तरूणांनी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शरद पवार विचार मंच इथे रीतसर प्रवेश केला.

सामाजिक संघटनेच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काम केले जाईल असे यावेळी श्री शशीकांत देशकर यानी सांगितले. जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांनी यावेळी सुशिक्षित तरुणांचे स्वागत केले तसेच त्यांची विठ्ठल मंदिर प्रभागातील वॉर्डनिहाय नियुक्त्या करून, नियुक्ती पत्र देण्यात आले. इंजिनिअर मंगेश अशोक बोकडे, बी.ई मैकेनिकल यांची बालाजी वॉर्ड अध्यक्ष पदी , अक्षय सगदेव यांची गणपती वॉर्ड अध्यक्ष पदी, तसेच पंकज मलिक यांची बिनबा वॉर्ड अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.शरद पवार विचार मंच मध्ये प्रवेशित करणारे इंजिनिअर मंगेश बोकडे, इंजिनिअर गीतेश श्रीकृष्ण नंदुरकर, इंजिनिअर शुभम प्रकाश शिवनकर ,अक्षय सगदेव,पंकज मलिक ,निलेश बोबडे,योगेश बुरडकर, यांचा समावेश होता.यावेळी प्रमुख उपस्थिती वॉर्डातील ज्येष्ठ नागरिक , विजयजी बोढणे, देवराव दुरतकर जिल्हा उपाध्यक्ष संजय तुरीले, बाबुपेठ प्रभाग अध्यक्ष शुभम प्रजापती, बाबा सातपुते, प्रशांत चिपावार, राहुल वासेकर, आशिष खिरटकर, राहुल आक्केवार यांची होती.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here