प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस – मागील 27 वर्षांपासून घुगूसला नगरपरिषदेचा दर्जा मिळावा यासाठी अनेकजण प्रयत्नशील होते मात्र भाजप सरकारच्या काळात ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही.
सत्ताबदल झाल्यावर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर व आमदार किशोर जोरगेवारांनी ही मागणी सतत रेटल्यावर घुगूस नगरपरिषदेची घोषणा झाली.
शासकीय नियमानुसार जिल्हाधिकारी यांनी घुग्गुस नगरपरिषदेवर आक्षेप असल्यास हरकती द्यावा असं पत्र जारी केले त्यानंतर मात्र 6 जणांनी यावर लेखी आक्षेप घेतला.
13 ऑक्टोम्बरला जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी जनसूनवणीचे आयोजन करीत आक्षेपकर्त्याना बोलाविले मात्र फक्त 2 जणांनी उपस्थित राहून आक्षेप मागे घेतला बाकी 4 जण अनुपस्थित होते.
त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी भाजप नेत्याने भूलथापा देत आक्षेप घ्यायला सांगितल्याचा लेखी खुलासा एकाने जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केला.
जिल्हा परिषदेचे पद जाणार या भीतीने भाजपच्या वतीने आक्षेप घेण्यात आले अशी खमंग चर्चा घुगूस शहरात चांगलीच रंगली आहे.
ज्या 6 जणांनी घुगूस नगरपरिषेदेबाबत आक्षेप घेतला त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी घुगूस कांग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी केली.