जिल्हा परिषदेच्या शाळेतील साहित्य गहाळ

0
396
Advertisements

गणेश लोंढे / कोरपना
चंद्रपूर जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेला कोरपना तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख आहे कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये गावखेड्या पर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविण्या करिता शासनाने प्रत्येक गावात जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण मिळावे या करिता गाव तिथे प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली
त्या काळात बनविलेल्या शाळा आज त्यातील अनेक शाळा जीर्णवस्थेत झाल्या आहेत
महाराष्ट्र शासनाने ९ जानेवारी २०१२ शासन परिपत्रक काढत जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ मोडळकीस आलेल्या धोकादायक इमारत बाधण्यासंबंधी शासनाने निर्णय घेतला

कोरपना पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शेरज बु.येथील जिल्हा परिषद शाळा जीर्ण झाल्यामुळे निर्लखीत करून पाडण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीचे साहित्य ज्यात दरवाजे,खिडक्या,ग्रील,व इतर सामान शासनाच्या निर्णयाप्रमाणे लिलाव न करता परस्पर भंगारमध्ये विकून सरपंच सचिव व ठेकेदार शाळासुधार समिती प्रमुख व मुख्याध्यापक यांनी संगनमताने शासकीय सामानाची अफरातफर केल्याचा आरोप गावातील नागरिकांनी करत याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करून संबंधितांकडून साहित्याची रक्कम जि. प./ प.स.च्या खजिन्यात जमा करण्याची तक्रार गावकऱ्यांनी शिक्षण अधिकारी चंद्रपूर व संवर्ग विकास अधिकारी कोरपना यांचेकडे दि २३/ ०९/ २०२० निवेदनातून केली आहे
सदर प्रकरनातील इमारत ही जी. प.ची मालमत्ता होती व त्यावर प.स.कोरपनाचे नियंत्रण होते सार्वजनिक व सरकारी इमारत असल्यामुळे नियमाप्रमाणे तिच्या साहित्याचा उदा.दरवाजे, खिडक्या,ग्रील,लोखंडी रॉड इत्यादी सामानाचा लिलाव करून येणारी रक्कम जि. प./ प.स.च्या खजिन्यात जमा करणे बंधनकारक होते मात्र असे काहीही न झाल्यामुळे नागरिकात संभ्रम निर्माण झाला असून एक महिना लोटूनही सदर प्रकरणात संबंधित विभागाकडून दिरंगाई होत असल्याने गावातील नागरिकात संतापाची लाट पसरली आहे येत्या आठ दिवसात सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी विरुद्ध कारवाई करून खजिन्यात रक्कम वसुलीची प्रक्रिया न केल्यास पंचायत समिती कार्यलयासमोर आंदोलनाचा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे.

Advertisements

प्रतिक्रिया

मी हेटी या गावात राहते गटग्रामपंचायत असल्याने आधी ग्रामपंचायत शेरज बु.येथे सरपंच होती माझा कार्यकाळ ७ / १०/ २०२० पर्यंत संपलेला आहे माझा कार्यकाळ संपल्यामुळे मी हेटी या गावात राहते मला या बाबत माहिती नाही सदर शाळेची इमारत अतिशय जीर्ण झाल्यामुळे मुलांना धोका असल्याने आम्ही निर्लखीत करण्याचा तसा प्रस्ताव जिल्हा स्तरावर सादर केला होता त्या कामाचे इ. टेंडर झाले असून कंत्राटदाराला जिल्हा स्तरावरून काम देण्यात आल्याची माहिती आहे माझा कार्यकाळ संपल्यावर शाळेची इमारत पाडण्यात आली आमच्यावर लावण्यात येत असणारे आरोप खोटे आहे .

*सौ.भारती जरिले*
*माजी सरपंच ग्रामपंचायत शेरज बु.*

सदर प्रकरण चौकशीत असून लवकरच गावातील नागरिकांना या प्रकरणातील अहवाल प्राप्त करून देऊ आणि जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई करू आणि नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू
*बाबाराव पाचपाटिल*
*संवर्ग विकास अधिकारी*
*प.स.कोरपना*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here