चंद्रपूर – ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी प्रा.अनिल डहाके यांनी ओबीसी जनगणना सायकल यात्रा काढली ते समाजात कुतूहलाचा विषय झाला आहे.प्रा.अनिल डहाके हे शिक्षकी पेशा तसेच मराठा सेवा संघाचे जिल्हासचिव या पदावर कार्यरत असून त्यांना सामाजिक कामाची प्रचंड आवड आहे.ते सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर भूमिका घेऊन काम करतात.
16 ऑक्टोबर 2020 ला पत्नीचा(स्मिता)वाढदिवस ते 12 नोव्हेंबर2020 ला मुलाचा (सिद्धांत)वाढदिवस असा 28 दिवसांचा प्रवास सायकलवर करून जिल्हाभर ओबीसी जनगणना झाली पाहिजे यासाठी प्रबोधन करण्याचे ठरवून पत्नी व मुलाला अभिनव भेट देत आहे.
त्यांनी आपल्या सायकल पुढे”भिर भिरत्या ओबीसी पाखरांनो एका घरट्यात या रे अपुरे ते स्वप्न 52%ओबीसी जातनिहाय जनगणनेच तुम्ही साकार करा रे”अशा आशयाचे फलक लावले आहे.सोबतच घर तिथे पाटी असा उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे.ते सोबत ओबीसी जनगणना करा अशा आशयाच्या पाट्या घेऊन फिरतातात व त्या वाटप करतात.
आज नवव्या दिवशी तुकूम – गांधी चौक- छोटा बाजार असा प्रवास केला.छोटा बाजार,चंद्रपूर येथे राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती,महाराष्ट्र तर्फे ओबीसी जनगणना सायकल यात्रेचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी ओबीसी जनगणना सायकल यात्रेत सुनील वडस्कर,पाऊणकर साहेब सोबत होते.
या यात्रेचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष हाजी अनवर अली, महासचिव फिरोजखान पठाण, सय्यद मजहर अली, इस्माइल शेख, गूफरान शेख,अजिज शेख,साजीद मिर्जा, असगर अली, मोहसीन खान, रशिद खान, मो. इलियास, मूजफ्फर अली, फिरोजखान,प्रशांत तेजे व समितीचे इतर सदस्य कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते….
राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीने केले ओबीसी जनगणना सायकल यात्रेचे स्वागत
Advertisements