उमेद’ च्या खासगीकरनाविरोधात दिशा समितीत ठराव

0
242
Advertisements

चंद्रपूर  : उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा बाहयसंस्थेकडे वर्ग करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने मागे घेण्याचा व पुर्वीप्रमाणेच अभियान सुरू ठेवण्याचा ठराव नियोजन भवनात झालेल्या दिशा समितीच्या समितीत घेण्यात आला.

मागील सात वर्षापासून जिल्हयात सुरू असलेल्या उमेद अभियानात जिल्हयातील सुमारे 3 लाख कुटूंबे सहभागी असून, या माध्यमातून त्यांच्या आर्थिक गरजा भागत आहेत तसेच त्यांच्यासाठी उपजिविकेच्या संधी उपलब्ध होत आहेत. जिल्हयाच्या विकासात हे अभियान महत्वाची भूमिका बजावत असताना शासनाने अचानकपणे या अभियानाला टप्याटप्याने कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अपुरा निधी देण्यासोबतच कार्यरत कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सेवा बाहयसंस्थेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. सदर निर्णय लोकहिताचा नसल्याने निर्णय मागे घेण्यास विनंती करण्याचा ठराव आमदार सुभाष धोटे यांनी झालेल्या सभेत मांडला. सदर ठरावास खासदार धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरूनुले यांनी अनुमोदन दिले.

Advertisements

याप्रसंगी खासदार धानोरकर यांनी ग्रामीण भागासाठी अभियान अतिशय महत्वाचे असून, केंद्रशासनाच्या या अभियानास कमकुवत करु नये, असे मत मांडले. स्वयंसहायता समुहातील महिलांना होत असलेल्या बॅकेच्या वित्तपुरवठयाचे प्रमाण भविष्यात वाढविण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. या विषयाला घेवून जिल्हयातील सर्व आमदारांसह मुख्यमंत्री यांना भेटणार असून, वेळ मागितल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी खासदार तसेच आमदार महोदयांना शिष्टमंडळाने निवेदन दिलेत. यावेळी प्रभागसंघाचे पदाधिकारी यांच्यासह उमेदचे कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here