ब्लुलाईन हटल्यास वाढेल चंद्रपूर मनपाचे उत्पन्न – सभापती राहुल पावडे

0
271
Advertisements

चंद्रपूर  – पुररेषेअंतर्गत ( ब्लुलाईन ) येणाऱ्या मोठ्या परिसरामुळे नागरीकांना घरांची परवानगी मिळत नाही व त्यामुळे परवानगी स्वरूपात मिळणारे पालिकेचे उत्पन्नही वाढु शकत नाही. ब्लुलाईन काढण्याची परिसरातील नागरीकांची मागणी लक्षात घेता याकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश मा. सभापती  राहुल पावडे यांनी २१ ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत दिले.
पाटबंधारे विभागाच्या सर्व्हेनुसार वडगाव, गोविंदपूर रिठ, पठाणपुरा या परिसरातील बहुतांश भाग हा पुररेषेअंतर्गत ( ब्लुलाईन ) येतो. त्यामुळे या भागातील बऱ्याचश्या लोकांचे प्लॉट डायव्हर्टेड असुन देखील त्यांना घर बांधण्यास परवानगी मिळु शकत नाहीये. यासंबंधी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे हा विषय लावुन धरला असून यासंबंधी काही बैठकीही झाल्या आहेत.
डायव्हर्शन असणाऱ्या भागातच ब्लुलाईन असल्याने मनपाला परवानगीच्या माध्यमातुन मिळणारे मोठे उत्पन्न बंद झाले आहे. वडगाव, गोविंदपूर रिठ, पठाणपुरा या परिसरात मोठ्या प्रमाणात डायव्हर्टेड भुखंड आहेत. यावर बांधकाम करावयाचे असल्यास मनपाच्या परवानगीची आवश्यकता असते. मात्र पाटबंधारे विभागाच्या सर्व्हेनुसार हा परीसर पुररेषेअंतर्गत असल्याने पालिकेतर्फे परवानगी देण्यात येत नाही.        या परिसरातील ब्लुलाईन काढल्यास मनपाला वर्षभरात १ कोटी रुपयांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे.  ब्लुलाईन काढण्याची परिसरातील नागरिकांची मागणी असल्याने यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याचे तसेच गुंठेवारी अंतर्गत भूखंड व बांधकाम नियमितीकरणामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडु शकते त्यामुळे याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश सभापतींनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here