भद्रावती – पिपरी (देश) तालुका भद्रावती येथील शेतकरी कैलास भाऊराव कुटेमाटे यांनी अती पाऊसामुळे हाती आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे सोयाबीन कापणी आणि काढणीला येणारा खर्च हा उत्पादनापेक्षा जास्त येत असल्यामुळे उभ्या पिकात जनावरे सोडली. पाऊसामुळे हाती आलेल्या सोयाबीन पिकावर बुरशी आणि सोयाबीन कुजायला सुरवात झाली त्यामुळे उभ्या पिकात शेतकऱ्यांना जनावरे सोडण्याची नामुष्कीली ओढवली आहे.तसेच पाऊसामुळें कापूस पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना उत्पादनात किमान ५०% नुकसान झाली आहे.तरी लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनानी याची दखल घेऊन तत्काळ नुकसान भरपाई सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष संदीप अण्णाजी कुटेमाटे,संस्थापक अनुप सुधाकर कुटेमाटे आणि शेतकरी बांधवांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी सोडले उभ्या पिकावर जनावरे
Advertisements