चंद्रपूर – देशात कुठेही महिलांवर अत्याचार व बलात्काराच्या घटना घडल्यास नागरिक पीडितेला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरतात.
परंतु चंद्रपूर शहरात मात्र उलटंच घडले, एका पीडितेला मात्र न्याय न मिळावा यासाठी चक्क पत्रकारांनी सेटिंगचा तगादा लावला आहे.
त्या पीडित मुलीची तक्रार न व्हावी यासाठी पत्रकारांनी पोलिसांना तक्रार नका घेऊ अशी विनवणी केली.
मात्र पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत त्या मुलीची तक्रार घेत आरोपीला अटक केली मात्र त्यानंतर ही पत्रकारांचा त्रास कमी झालेला नाही.
तक्रार मागे घ्यावी यासाठी सुद्धा पत्रकार त्या पीडितेला वारंवार संपर्क साधत आहे, इतकेच नव्हे तर आम्ही शहरातील मोठ्या समाजसेविका अस समजणारी एक महिला एका पोर्टल धारकाला सोबत घेत त्या मुलीला घरी बोलावून तक्रार मागे घेण्यास सांगितली.
मात्र ती पीडित न डगमगता अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या निर्णयावर ठाम राहिली.
इतकेच नव्हे तर आता पत्रकार आरोपी मुलाच्या घरी जात मुलीला पैसे द्या तक्रार मागे घ्या अशी जणू धमकीच देत आहे.
स्वतःवर झालेल्या अन्यायाबद्दल तक्रार दिल्यानंतर त्या पीडितेला काय वाटत असेल, कोणत्याही महिला संघटनेने त्या मुलीचं ऐकूण घेतलं नाही, मात्र समाजसेविकेचा मुखवटा घातलेल्या महिलांनी मात्र पैसे घे व गप्प बस अशी बतावणी केली.
या सर्व प्रकारात 1 स्थानिक वृत्त वाहिनीचा पत्रकार ज्याने तक्रार घेऊ नका असे पोलिसांना सांगितले, दुसरा डिजिटल वेब पोर्टलचा पत्रकार पैसे घ्या व गप्प बसा, तिसरा स्वयंघोषित पत्रकार व समाज सेविकेचा मुखवटा घातलेल्या महिला.
विशेष म्हणजे आरोपी हा अवैध धंद्यातील मोठा माफिया असून पैशाने तो सध्या सर्वाना विकत घेण्याची हिंमत करीत आहे.