चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून प्रचलित आहे, मोठे उद्योग असल्याने जिल्ह्यात हजारो कामगार या उद्योगात काम करतात, चंद्रपूर महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगारांची नेमणूक करण्यात आली मात्र कामगारांना अजूनही किमान वेतन कायदा लागू झाला नाही जे वेतन मिळत ते अनियमित.
सध्या शहरात भाजप आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात मोठे बॅनर लावून महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ मंजूर झाल्याचे दर्शविले.
आठवडा जात नाही त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी ही वेतनवाढ माझ्या पाठपुराव्याने झाली असा दावा व चित्रफीत सुद्धा प्रकाशित केली.
नियमानुसार पालिका कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळायलाच हवा परंतु कोरोना काळात पालिका वारंवार सांगत होती पालिकेजवळ पैसे नाही मग हा वाढीव वेतन कुठून देणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे.
ज्याप्रमाणे दोन्ही आमदारांनी वेतनवाढीचे दावे केले त्याप्रमाणे आपण कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनावर पाठपुरावा करायला हवा.
ह्याच कामगारांनी आपल्याला निवडणुकीत मते देत विधानसभेवर पाठविले आणि आपणचं त्यांना किमान वेतनापासून वंचित ठेवत आहात.
आपण यांच्या वेतन नियमाचा पाठपुरावा करा, नियमानुसार कामगारांना वेतन मिळाल्यास तेच कामगार शहरभर धन्यवादाचे बॅनर स्वतः लावतील.
आमदार साहेब कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाचा तरी पाठपुरावा करा
Advertisements