घुगूस -घुग्घूस : वढा रेती घाटावर धाड टाकून रेतीचे अवैध उत्खनन करणारे दोन ट्रॅक्टर उत्खनन अधिकारी अल्का खेडकर, बि.वाय. वरखडे यांच्या पथकाने जप्त केले. ही कारवाई बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली. या ट्रॅक्टरकडून एकूण २ लाख २१ हजार ८०० रुपये दंड वसुल करण्यात येणार आहे. जप्त केलेले ट्रॅक्टर पांढरकवडा ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आले आहे. वढा रेती घाटावरून मागील काही दिवसापासून रेती तस्करी सुरू आहे. आतापर्यंत हजारो ब्रास रेती चोरीस गेल्याने लाखो रुपयांचा महसुल बुडाला आहे. महसुल विभागाच्या या कारवाईन रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आजही अवैध वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून खनिकर्म विभागातर्फे कारवाई केलेल्या अनेक वाहनांवर ठोठावण्यात आलेला दंड कोट्यवधींच्या घरात असून तो आजपर्यंत वसूल करण्यात आला नाही हे मात्र विशेष.
मागील 7 महिन्यापासून करण्यात आलेल्या कारवाई मध्ये खनिकर्म अधिकारी कांबळे यांनी तब्बल 24 जणांना शो कास नोटीस बजावली परंतु 13 कोटींचा महसूल मात्र वसूल झाला नाही.