मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल….!

0
159
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
अहिल्याबाई होळकर,शबरी,रमाई योजनांच्या धर्तीवर आता अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र आवास योजना तयार करून “मॉ फातिमा” आवास नामकरण करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून “जनसत्याग्रह संघटना” अध्यक्ष सैय्यद आबीद अली यांना देण्यात आल्याचे कळते.मॉ फातिमा जयंतीचे औचित्य साधून अल्पसंख्याक समाजातील प्रथम महिला शिक्षिकेच्या नावाने योजना सुरू करावी अशी मागणी मदत व पुनर्वसन इतर मागास कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती.मुख्यमंत्र्यांनी सदर मागणीची दखल घेत अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाला आदेश देऊन ग्रामीण व शहरी भागात अल्पसंख्यांक समाजासाठी घरकुल योजना तयार करून योजनेचे नामकरण “मॉ फातिमा” आवास योजना करण्याचे निर्देश दिल्याची माहिती असून यामुळे अल्पसंख्याक समाजाला हक्काचा निवारा मिळण्याची संधीप्राप्त झाल्याची आशा बळावली आहे हे मात्र विशेष.
ग्रामीण व शहरी भागांमध्ये अनेकदा विविध योजनेतून सदर समाज दुर्लक्षित राहिलेला आहे.कित्येक ठिकाणी झोपड्या उभारून जिवन जगत असल्याचे पहायला मिळत असून इंदिरा व प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासून सदर समाज वंचित असल्याचे चित्र आहे.यांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी निवाऱ्याची अत्यंत गरज असून मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी दखल घेतल्याने अल्पसंख्यांक(मुस्लिम) समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक यांनाही निवेदन देऊन सदर योजनेला मुर्त रूप देण्याची मागणी केल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here