सिकलसेल ग्रस्त अपंग, अल्पवयीन मुलाला शिक्षकाने केली मारहाण

0
455
Advertisements

चंद्रपूर – विसापूर येथे अल्पवयीन अपंग, सिकलसेल ग्रस्त मुलाला शिक्षकाने मारहाण केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
मारहाण करणाऱ्या शिक्षकाच नाव नितीन झिलटे असे आहे, ते बोरगाव येथील आश्रम शाळेत शिक्षक आहे.
या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशनला दिली असता आज तब्बल 12 दिवस लोटूनही त्या शिक्षकावर काहीच कारवाई करण्यात आली नाही.
विकलांग एकता शक्ती संघटनेने रोशन काळे या 15 वर्षीय मुलाला न्याय देण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
रोशनला दर 3 महिन्यानंतर रक्त द्यावे लागते अश्या परिस्थितीत शिक्षकाने मारहाण करणे योग्य नाहींच, त्या शिक्षकाची पत्नी ही विसापूर ग्राम पंचायतीची सरपंच होती त्या कारणामुळे राजकीय बळाचा वापर करीत कारवाई टाळत असल्याचा आरोप विकलांग एकता शक्ती संघटनेद्वारे करण्यात आला आहे.

जर रोशनला न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व अपंग बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here