सर्पमित्रांनी दिले अजगराला जिवनदान

0
184
Advertisements

वरोरा – दि. 21/10/2020 ला दुपारी 1.30 वाजताच्या दरम्यान सर्पमित्र विशाल ढोक व हिमालय मडावी यांना पावना-वरोरा मार्गावरील जामगाव(रै.) येथुन रविंद्र ठेंगणे यांच्या शेतात साप असल्याचे कळविण्यात आले. त्या वेळेस सर्पमित्र विशाल ढोक, हिमालय मडावी, व अनिकेत मेश्राम यांनी रविंद्र ठेंगणे यांच्या शेतातील थेट साप असल्याचे ठिकान गाठुन 6फुट लांबीचा अजगर (Indian Rock Python) या सापाला पकडले व त्याची माहिती न्यु. फोन्डेशनचे अध्यक्ष श्री. सुशिल शिरसाट यांना देण्यात आली. त्यांनी अजगर या सापाला वनविभाग येथे सुपूर्द करुन जंगलामध्ये सोडुन दिले या वेळेस वन अधिकारी RFO श्री. राठोड, श्री. रामटेके, श्री. डोर्लीकर व सर्पमित्र सुशिल शिरसाट, विशाल ढोक, हिमालय मडावी, व अनिकेत मेश्राम उपस्थित होते. अशाप्रकारे पुन्हा एकदा सर्पमित्रांनी सापाचे प्राण वाचवुन सापाला जिवनदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here