कु.रागिनींच्या सुयशाने वाढविला परिवाराचा सन्मान

0
557
Advertisements

भद्रावती/ अब्बासी अजानी
मुलगी शिकली,प्रगती झाली’.हे शासकीय धोरणाच ब्रीद चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराच्या एका मध्यम परिवारातील मुलीने सार्थक करून दाखविले आहे.कु.रागिणी कुंदन पाटील असे या मुलीचे नाव आहे.भद्रावती शहरातील आंबेडकर वार्डामधील या विद्यार्थिनीने नुकत्याच झालेल्या नीट च्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून संपूर्ण देशात २७० वे स्थान मिळविले असून तिने या परीक्षेतील ७२० गुणांपैकी एकूण ६२० गुण मिळवून ९८.८४ टक्केवारी गाठत आपल्या परिवाराची कीर्ती वाढविली आहे.तिने नागपूर येथील वानखेडे एकेडमी मधून एक वर्षाचा अभ्यासक्रम दिवसरात्र मेहनत करून सफल करत आपल्या परिवाराचे स्वप्न पूर्ण केल्याने शहरभर तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.महत्वाची बाब म्हणजे ज्या उद्देशातून तीने हे यशाचे शिखर गाठले आहे ती उद्देश्यपूर्ती वैद्यकीय क्षेत्रातील एम बी बी एस याकरिता आपला प्रवेश निश्चित करून पूर्ण केली आहे.तिने तिच्या यशाकरिता आई दीपाली,वडील कुंदन,काका निलेश,काकू संघा तसेच परिवारातील सर्व सदस्यांसह आपल्या गुरुवर्यांना पात्र ठरविले आहे.सर्वांनी तिला तिच्या या यशाकरिता तोंडभरून कौतुक करून पुढील वाटचालीकरिता भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here