वरोरा मनसेला पडला खळखळखट्याक चा विसर

0
300
Advertisements

वरोरा – वर्धा नदी काठावरील वाळू उत्खनन केलेल्या खड्ड्यात एक गुराखी मरण पावला होता, त्या घटनेनंतर प्रशासन वाळू तस्करीवर आळा घालणार अशी अपेक्षा होती मात्र तसे काही झाले नाही.
त्याउलट वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली, मनसे वरोरा तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना वाळू तस्करीबाबत निवेदन दिले जर निवेदनाची दखल न घेतल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
मनसे हा पक्ष अन्यायाविरोधात खळखळखट्याक करणारा पक्ष आहे मात्र वरोरा तालुक्यात खळखळखट्याक चा विसर मनसे ला पडला, गुरुवारी तहसील कार्यालयातीलच टॉवर वर चढून विरुगिरी आंदोलन सुरू केले.
जोपर्यंत वाळू तस्करी बंद होणार नाही असे ठोस आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत विरुगिरी सुरू राहणार असा दम मनसे तालुकाध्यक्ष डहाणे यांनी प्रशासनाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here