आमदार सुभाष धोटे यांना मुस्लिम आरक्षण समितीचे निवेदन

0
162
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
मुस्लिम समाजाची सामाजिक,राजकीय, आर्थिक,शैक्षणिक स्थीती अतिमागास झाल्याचे विदारक चित्र न्यायमूर्ती सच्चर आयोग डॉ.महेमदुररहमान समितीच्या अहवालात समोर आला आहे.मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे मुस्लिम समाज दुर्लक्षित राहीला.शैक्षणिक क्षेत्रात पण अत्यंत मागासला आहे.यापूर्वी न्यायालयाने मुस्लिम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आरक्षणाची गरज नमूद केली मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुस्लिम समाज नेहमी अन्यायाचा बळी ठरला आहे.आज मुस्लिम समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची व गंभीर असून शैक्षणिक क्षेत्रातील मागासलेपणामुळे हा समाज विकासाच्या प्रवाहपासून कोसोदूर गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.करीता मुस्लिमांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी आरक्षण लागू करावे या मागणीचे निवेदन “मुस्लिम आरक्षण निर्णायक समितीतर्फे राज्यातील मंत्री, आमदार,खासदार,लोकप्रतिनिधींना देण्यात येत असून याच श्रेणीत राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनाही मुस्लिम समाजातर्फे निवेदन देण्यात आले.सदर मागणीला समर्थन देत,शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन निवेदन स्वीकारताना आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित मुस्लिम समाज बांधवांना दिले.यावेळी सैय्यद आबीद अली,शब्बीर पठाण,आसीफ शेख, शाहनवाज़,महेमूद,मुसा,एजाज़ शेख, फिरोज पठाण,महेमूद शेख,इर्शाद शेख यांच्यासह मोठ्याप्रमाणात मुस्लिम बांधव उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here