महासेल मराठीतच हवा – मनसेचा मराठी दणका

0
205
Advertisements

ताज्या घडामोडी – नवरात्रीच्या महत्वाच्या सणात ई-कॉमर्स कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महासेल सुरू केला आहे.
यामध्ये अमेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
या ई कॉमर्स कंपन्यांवर मनसेच्या वतीने मातृभाषेचा दणका दिला आहे, या कंपन्यांच्या अँप इंग्लिश, हिंदी, तामिळ व तेलगू भाषेत कार्यरत आहे मात्र मराठी भाषेत ही अँप कंपनीने कार्यान्वित केलेली नाही.
येत्या 7 दिवसात जर ह्या अँप मराठी भाषेत होणार नाही यर मनसे स्टाईल ने तुमची दिवाळी साजरी करू असा खरमरीत इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
मनसेच्या या आक्रमक भूमिकेची दखल अमेझॉन ने घेतली असून लवकरचं अँप मराठी भाषेत कार्यान्वित करू असा मेल सुद्धा मनसे नेते अखिल चित्रे यांना मिळाला आहे.
दक्षिण भारतात तिथल्या स्थानिक भाषेत अमेझॉन व फ्लिपकार्ट अँप कार्यान्वित आहे मात्र महाराष्ट्रात मराठी भाषा का डावलली जाते म्हणून आता महाराष्ट्रात सुद्धा मराठीत अँप कार्यान्वित करावीच लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here