रेती घाटावर धाड, जेसीबी व 2 हायवा सोडून एकावर कारवाई

0
298
Advertisements

घुगूस – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याचा वावर वाढला आहे, दारू असो, सुगंधित तंबाखू की रेती या सर्वांची तस्करीचा जिल्ह्यात बोलबाला आहे.
प्रशासन कारवाईच्या नावावर कधी तस्करांवर सुद्धा मेहरबान होत असते, असेच 1 प्रकरण घुगूस मध्ये घडले , वर्धा नदीवरील घोडा घाटात अवैध रेतीचे उत्खनन सुरू असल्याची माहिती खनिकर्म विभागाला मिळाली असता रात्री त्या घाटावर कारवाई करण्यात आली.
खनिकर्म महिला अधिकारी अल्का खेडकर यांच्या नेतृत्वाखाली संजय वरकडे व चमू यांनी पोलिसांना सोबत घेत त्या घाटावर धाड मारली असता एक जेसीबी मशीन 3 हायवा ट्रक जप्त केले मात्र एक हायवा क्रमांक एमएच 29 AB 7020 वर कारवाई करण्यात आली बाकी 2 हायवा सोडण्यात आले.
दोन हायवा क्रमांक mh29 ab 2930 व mh29 ab 9688 व जेसीबी ला कोणत्या कारणाने सोडण्यात आले ते अजूनही अस्पष्ट आहे.
खेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी घाटावर धाड मारली असता त्या ठिकाणी अजून काही वाहन होते त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

या कारवाईत कुठं ना कुठे खिचडी मात्र शिजलेली आहे, नाहीतर महसूल विभागाला भारी भरकम दंडाची रक्कम मिळाली असती.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here