“यशोमती ठाकूर” यांच्या राजीनाम्याची भाजपकडून मागणी

0
199
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुका भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांनी एका पोलिस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी न्यायलयांनी त्यांना 3 महिन्यांची सजा व 15 हजारांचा दंड ठोठावला असताना यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही.त्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा अन्यथा यापुढे मोठा आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यासंबंधीचे निवेदन कोरपना तहसीलदार यांना देण्यात आले असून सदर आंदोलनात कोरपना तालुका भाजपाध्यक्ष नारायण हिवरकर यांच्यासह अरूण मडावी,पुरूषोत्तम भोंगळे, नूतन कुमार जीवने,विजय रणदीवे,प्रमोद कोडापे, दिनेश खडसे,निखील भोंगळे,अशोक तोडासम, रामा पेंदोर इत्यादी भाजप पदाधिकारी,कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here