चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील युवकांनी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या पुढाकारात मोठया संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेनेचे जेष्ठनेते अजयजी वैरागडे महाराष्ट्र उपसरचिटणीस अभियंता सेना महानिर्मिती राहूलभाऊ बेले युवासेना जिल्हा समन्वयक इंजि निलेशभाऊ बेलखेडे शिवसेनेचे अजूभाऊ कोंडलेवार ह्या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांचे नेत्तृत्वात. प्रभात क्र 12 मधील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गणेश रासपायले यांनी विश्व हिंदू परिषद महानगर मंत्री, बजरंग दल जिल्हा उपाध्यक्ष, श्री काळाराम क्रीडा व्यायाम प्रसारक मंडळ अध्यक्ष ही विविध संघटनात्मक सामाजिक कार्यात काम केले. मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व जोपासणाऱ्या पक्षाला प्रेरित होऊन अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
गणेश रासपायले यांचे सोबत तुषार ससुधे, हेमेन्द्र तिवारी, नितेश खंगार, शैलेश कर्णेवार, नितीन काळे, सतीश पोटे, शुभम राहुलकर, शुभम कोवासे, नरेश आकनुरवार, सौरभ इंगोले, लखन मेसवाल, बादल मेश्राम, नवनीत कर्णेवार, प्रणय राहुरकर, यांनी शिवसेनेत प्रवेश घेऊन शिवबंधन बांधले.