घुगूस – राज्यात अजूनही वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्याने सर्रास पणे वाळू तस्करी चंद्रपूर जिल्ह्यात सुरू आहे.
घुगूस येथील वर्धा नदीच्या काठावर नकोडा, चिंचोली या घाटावरून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे, दर आठ दिवसाला प्रशासनातर्फे वाळू तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात येते.
त्यामुळे वाळू तस्करांनी नवी शक्कल लढवीत वाळू तस्करी रात्री सुरू केली आहे.
वाळू तस्कर घाटातून रेतीची वाहतूक करीत एका ठिकाणी ही संपूर्ण रेती साठवून ठेवतो व नंतर 5 हजार रुपये प्रमाणे ट्रॅक्टर, 50 हजारात 1 हायवा ट्रक चा समावेश आहे.
या वाळू तस्करीत अनेक बड्या नेत्यांचे नाव आहे, म्हणून हे तस्कर आज मुजोरीवर उतरले आहे.
जप्त केलेल्या वाळूचा लिलाव जेव्हा करण्यात येतो त्यावेळी आपल्या मर्जितल्या माणसाला जप्त वाळू देण्यात येते मग हीच वाळू जिल्हाभरात जास्त भावाने विकल्या जात आहे.
वाळू तस्करांमुळे आज वाळूचे भाव गगनाला भिडले आहे.