जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याचे सत्र सुरुचं

0
376
Advertisements

ब्रम्हपुरी  : ब्रम्हपुरी दक्षिण वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सायगाव येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना दिनांक 18 ऑक्टोबरला तीन वाजताच्या सुमारास घडली. साधोजी उरकुडा लेनगुरे (वय 68) असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे गेल्या पंधरा दिवसांमध्ये वाघाच्या हल्ल्यातील ही चौथी घटना असल्याने दक्षिण वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वाघाची दहशत पसरली आहे.

सायगाव येथील साधोजी लेनगुरे हे स्वतःचे बैल चालण्याकरिता सायगाव येथील क्रमांक 1020 वीस या जंगलात बैल चालत असताना अचानक वाघाने हल्ला केला यात ते गंभीर जखमी झाले वाघाच्या हल्ल्याची माहिती होताच क्षेत्र सहाय्यक ए पी करंडे, वनरक्षक पी आर चक्रे, वनरक्षक बी जे वडडे, डी आर पेंदोर हे घटनास्थळी उपस्थित झाले व जखमीला ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले साधोजी लेनगुरे वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना ब्रह्मपुरी वरून गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे सततच्या घडणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून वनविभागाने याकडे लक्ष देऊन वाघाला ठार मारण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here