चंद्रपूर – भटाळी मधील खुल्या कोळसा खाणीत डोजर मागे घेत असताना 58 वर्षीय ब्लास्टिंग हेल्पर तानाजी गोमासे हे डोजरच्या संपर्कात आल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले.
या दुर्घटनेत गोमासे यांना दोन्ही पाय गमवावे लागले.
घटनेनंतर गोमासे यांना चंद्रपूर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची परिस्थिती सध्या नाजूक अवस्थेत आहे.
भटाळी कोळसा खाणीच्या आत टॉवर लाईट लावण्याचे काम सुरू असून डोजर ऑपरेटर रोड बनविण्याच्या कामात व्यस्त होता.
ज्यावेळी डोजर रिव्हर्स घेत होते त्यावेळी गोमासे यांनी ऑपरेटरला वाहन मागे घेऊ नका असे वारंवार सांगितले कारण त्या ठिकाणी ब्लास्टिंग साठी खड्डा करण्यात आला होता परंतु गोमासे यांचा आवाज ऑपरेटर पर्यन्त पोहचला नाही व डोजर त्यांच्या पायावर चालून गेले.
जेव्हा डोजर ऑपरेटर आपलं काम करतो नेमकं त्यावेळी एक सहायक डोजरला दिशा व निर्देश देत असतो परंतु सहायक विना डोजर ऑपरेटर आपलं काम करीत होता.
या घटनेत वेकोली प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे, सुरक्षेच्या नावाखाली कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला टाकण्याचे काम वेकोली द्वारे केल्या गेले आहे.
वेकोली तर्फे ही चूक झाली नसती तर गोमासे यांना आपले पाय गमवावे लागले नसते.
सुरक्षेच्या नावाखाली वेकोली कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला
Advertisements