राज्यपालांच्या भूमिकेची नोंद गिनीज बुकात करायला हवी – विजय वडेट्टीवार यांचा टोला

0
334
Advertisements

ताज्या घडामोडी – मंदिर उघडण्यासाठी भाजपने राज्यभर आंदोलन केले मात्र या आंदोलनादरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरळ मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरे उघडण्यात यावी, हिंदुत्व दाखविण्याची हीच खरी वेळ आहे असे नमूद केले होते.

त्या पत्रावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांना खरमरीत उत्तर दिले, खरं तर राज्यपालांना आपली भूमिका काय? आपण भाजप पक्षाचे राज्यपाल नाही असे भान ठेवूनच त्यांनी पत्र लिहायला हवे होते मात्र त्यांनी असे न करता मी भाजपचा कार्यकर्ताच आहो हे राज्याला दाखवून दिले.

Advertisements

नुकतेच गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यपालांनी आपले शब्द जपून वापरायला हवे होते असे म्हटले, राज्यपाल कोश्यारी यांच्या भूमिकेमुळे गृहमंत्री शाह सुद्धा त्यांच्यावर चांगलेच नाराज झाले आहे. शाह यांच्या प्रतिक्रियेवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या निष्पक्ष भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राज्याचे राज्यपाल यांच्या भूमिकेची नोंद सरळ गिनीज बुकात करण्याजोगी आहे, आतापर्यंत एकही राज्यपालाने कोश्यारी यांच्यासारखी भूमिका घेतली नाही, राज्यपालांच्या चष्म्याची नजर काय बघत आहे तो त्यांनी काढून टाकावा व आपली भूमिका नेहमीच निष्पक्ष असावी पक्षपाती नसावी असा टोला देखील विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here