माणिकगड सिमेंट कंपनीचा प्रताप

0
265
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
राजूरा-जिवती तालुक्याला जोडणाऱ्या आदिवासी भागातील कुसुंबी-नोकारी या सार्वजनिक रस्त्यावर माणिकगड सिमेंट कंपनीने बांधकमाची परवानगी न घेता नियमबाह्य सायलो क्रेशर रोपे लाईनचे बांधकाम करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे.हा रस्ता वहिवाटीचा व भूमापन नकाशात नमूद असून महसूल विभागाने भूपृष्ट,भूसंपादन अधिकार बहाल केले नसताना सदर रस्त्यावर कंपनीने अतिक्रमण करून सार्वजनिक रस्ता दोन चुनखडी खदानच्या मध्यभागातुन करून वाटसरूंना जाण्या-येण्याच्या ठिकाणी गेट बसवून अडथळा निर्माण केला.संतप्त शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे महसूल अधिकारी व पोलिस प्रशासनाने वाद चीघळण्यापुर्वीच कंपनी प्रशासनाला गेट उघडण्यास भाग पाडले.मात्र अनाधिकृत बांधकाम रस्तयावर असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच यामुळे प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत कुसुंबी रस्त्याचे बांधकाम अर्धवट पडले आहे.तो रस्ता नकाशाप्रमाणे माणिकगड माईन्स कॉलनी मधून गोवारीगुडा पर्यंतचा अर्धवट बांधकाम पूर्ण करावा अशी मागणी परिसरातील आदिवासी बांधवांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here