गुरख्यावर वाघाचा हल्ला

0
1173
Advertisements

सिंदेवाही प्रतिनिधी / सुनील घाटे

ताडोबा पर्यटन शेत्र अंतर्गत बफर झोन शेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट्याची दहशत वाढली असून वासेरा येथील तेजराम किसन नागपुरे हा इसम स्वतःचे मालकीचे जनावरे चराई करता जंगलात नेले असता आज अचानक एक वाजता चे सुमारास मनमोहन कक्ष क्रमांक 570 जंगल एरिया वाघाने दबा धरून बसला असता तेजराम नागापुरे हा स्वतःचे गुरेढोरे चराई करीत असताना वाघाने त्याच्यावर हल्ला केला त्यात तो जखमी झाला समयसुचुकतेचे मुळे तेजरामने वाघाला कुर्‍हाडीचे घाव घालून पळवून लावले.
शिवनी वनपरिक्षेत्रातील वासेरा 570 कक्ष क्रमांक जंगलात वासेरा येथील तेजराम किसन नागपुरे हा इसम जंगलात स्वतःचे गुरेढोरे चराई करता गेला असता मंनमोहन जंगल शेजारील जंगलात वाघ दबा धरून बसला होता नेहमीप्रमाणेच स्वतःचे गुरेढोरे चराई करीत असताना वाघाने तेजराम वर हल्ला केला, हल्ला होताच तेजराम ने वाघाला कुर्‍हाडीने पिटाळून लावल.

Advertisements

तेजरामच्या पाठीवर वाघाने जखम केली असून कसाबसा तो वाघाच्या तावडीतून बचावला लगेच स्वतःच्या कुऱ्हाडीने वाघाला त्याने पिटाळून लावले आरडाओरड केल्यानंतर बाकी गुराख्यांनी त्याला बचावले वाघ समोर पळवाटे द्वारे पळून गेला लगेच ही माहिती गावातील युवकांना देण्यात आली गावातील दोन-तीन युवकांनी वनविभाग शिवने यांना मनमोहन एरिया वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला असे गावातील युवकांनी वनविभागाला सांगितले वनविभागाने विलंब न करता होता वनविभागाची गाडी त्या दिशेने पाठवण्यात आली.

वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊराव तुपे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल श्री चिकाटे साहेब, वनरक्षक सुरेश मेश्राम, वनरक्षक एस एस टापरे यांनी मनमोहन एरीया कडे पदार्पण केले व तेजराम किसन नागपुरे वय 60 वर्ष या जखमीला ताबडतोब गाडीत बसवून सिंदेवाही प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रथम हलवण्यात आले.
सिंदेवाही प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वनविभागाकडून तेजराम किसन नागापुरे यांना तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली जखमेवर सिंदेवाही येथे प्रथम उपचार विलंब होत असल्यामुळे जखमीला चंद्रपूर रुग्णालयात हलवण्यात येत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी तुपे यांनी सदर प्रतिनिधी जवळ दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here