गडचांदूर महावितरणाच्या नावाने चांगभलं…..!

0
265
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर महावितरण विभागच्या गलथान कारभारामुळे डोकेदुखी वाढली असून विजेच्या लपंडावमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहे.सततच्या “बत्ती गुल” मुळे संतापाची लाट पसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.दिवस असो की रात्र विज पुरवठा कितीदा खंडीत होते हे सांगणेही सध्या कठीण होऊन बसले आहे.महावितरणाच्या नावाने सर्वत्र बोंबाबोंब सुरू असताना संबंधित विभाग अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.विजेच्या समस्येतून नागरिकांची सुटका केव्हा “गडचांदूर महावितरणाच्या नावाने चांगभलं”असं म्हणण्याची पाळी आली आहे.विज पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने अनेक विद्युत उपकरणे निव्वळ शोभेच्या वस्तू बनल्या आहे.विवीध कामांसाठी विजेचा वापर करणाऱ्यांचा मनस्ताप वाढत असून कित्येक दुकानदारांना नुकसान सहन करावे लागत आहे.आगोदरच कोरोनामुळे जनता कर्फ्यू,लाकडाऊनने लोकांचे कंबरडे मोडले आहे.गेल्या सहा महिन्यापासून कधी बंद तर काधी सुरूच्या मालिकेत उद्योग धंदे डबघाईला आल्याचे विदारक चित्र आहे.आता दुकाने सुरू करून कामांची सुरुवात केली तर विजेची समस्या निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत काय करावे काय नाही अशी समस्या निर्माण झाली आहे.शहरात जर अशी परिस्थिती असेल तर परिसरातील खेड्यापाड्यात काय असेल याची कल्पनाच केलेली बरी.सतत खंडीत होत असलेला विज पुरवठा नागरिकांच्या जिव्हारी लागत असून सदर समस्या त्वरित मार्गी न लागल्यास आगामी काळात मोठे जनआंदोलन उभारण्याची शक्यता नाकारता येत नाही.संबंधीत विभाग अधिकाऱ्यांनी याकडे गंभीरतेने पाहण्याची गरज असून विजेच्या लपंडावातून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here