मच्छी पकडणारे व ठोक विक्रेते यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करा

0
242
Advertisements

चंद्रपूर – जिल्ह्यातील इराई धरणात मच्छी पकडण्यासाठी जिल्ह्याबाहेरील मच्छीमार येत असतात परंतु त्या मच्छीमारांचे पोलीस व्हेरिफिकेशन कुणीही करीत नाही.
मच्छी पकडणारे व सप्लाय करणारे या सर्वांचे पोलीस व्हेरिफिकेशन करूनच त्यांना धरण परिसरात प्रवेश देण्यात यावा अन्यथा प्रवेश देण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन प्रकाश अधिकारी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
पोलीस व्हेरिफिकेशन न केल्याने काही ठिकाणी लूटमार व हत्येच्या घटना घडत आहे, त्याकरिता धरण परिसरात येणाऱ्या सर्वांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here