Advertisements
चंद्रपूर – 6 महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर जिम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शरीर स्वस्थ व सुदृढ करण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे परंतु सोशल डिस्टनसिंग चे पालन करूनच नागरिकांना व्यायाम करावा लागेल. विजयादशमीच्या मुहूर्तावर व्यायाम शाळा पूर्णपणे उघडण्यात येणार आहे.
व्यायाम शाळेच्या वेळा, मर्यादित संख्येत प्रवेश देणे, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांची आरोग्य तपासणी, व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे, उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, दररोज रात्री व्यायामशाळा बंद झाल्यावर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असणार आहे.
व्यायामशाळेतील स्टीम बाथ, सौना, शॉवर, झुम्बा व योगा हे पूर्णपणे बंद राहणार.