रुग्णांना जलद सेवा मिळावी यासाठी भूमिपुत्र ब्रिगेड तर्फे एम्बुलेन्सचे लोकार्पण

0
172
Advertisements
 चंद्रपूर-  भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १६ अॉक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूर दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली या ऐतिहासिक धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून भूमिपुत्र ब्रिगेड जि चंद्रपूर तर्फे कोरोना महामारीचे संकटात रुग्णांना अत्यावश्यक सेवा मिळण्यासाठी अॅम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले.    कोविड  प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या महामारीचा सामना करण्यासाठी रुग्णांना जलद आरोग्य सेवा मिळणे आवश्यक आहे हि बाब लक्षात घेता गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा लवकरात लवकर उपलब्ध व्हावे यासाठी भूमिपुत्र ब्रिगेडने पुढकार घेऊन अॅम्बुलन्सची सेवा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी डॉ राकेश गावतुरे, डॉ सचिन भेदे,डॉ विनोद माहुरकर, डॉ अनुप वासाडे,डॉ विवेक बांबोळे, डॉ सोनडवले, डॉ रीतेश राणे, डॉ मलोजवार, यांनी विशेष आर्थिक मदत करून अॅम्बुलन्सचे लोकार्पण कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती दर्शविली तसेच डॉ अभिलाषा बेहरे-गावतुरे, डॉ माहुरकर, भूमिपुत्र ब्रिगेडचे प्रदेश संघटक डॉ सिराज खान जिल्हाध्यक्ष विवेक बोरीकर, फिरोज पठाण, प्रा. माधव गुरनुले अॅड प्रशांत सोनुले, विजय मुसळे, हेमंत भगत, सुरज मत्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here