चंद्रपूर – आशिया खंडातील औष्णिक विद्युत प्रकल्प म्हणून चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनचे नाव आहे.
शहरातील उर्जानगर परिसरात हे औष्णिक विद्युत प्रकल्प केंद्र आहे, या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वीज उत्पादन होते.
औष्णिक विद्युत प्रकल्पात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन नादुरुस्त झाल्याने त्या जागी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.
या कामाचं कंत्राट अभि इंजिनिअरिंग कंपनीला मिळाले आहे, परंतु ह्या कोट्यावधी कंत्राटाच्या कामात मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून शिवसेना नेते बबलू कटरे यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
इराई धरणातून वीज निर्मिती केंद्राला पाण्याचा पुरवठा करणारी पाईपलाईन मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाली आहे त्याकरिता तब्बल 12 किलोमीटरची नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे, हा कंत्राट 100 ते 150 कोटींच्या घरात आहे, हे काम अभि इंजिनिअरिंग ला मिळाले असून कामात मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे.
आतापर्यंत 5 किलोमीटर पर्यंतचे काम झाले आहे.
ह्या 5 किलोमीटर मधील मोठी पाईपलाईन ही 5 ते 6 मीटर खोल असायला हवी व प्रत्येक पाईपला जोडणाऱ्या भागात हायड्रो टेस्ट न करता ही पाईपलाईन पुढे नेण्यात आली व सरफेस भागात रेती न टाकता ती अशीच बुजविण्यात आली आहे.
पावसाळ्यात ही पाईपलाईन जमिनीच्या वर आली आहे, कारण जेव्हा ही पाईपलाईन टाकण्यात आली त्यावेळी कुठलाही अंदाज न घेता थातुरमातुर काम करून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची उचल अभि इंजिनिअरिंग ने केली आहे असा थेट आरोप बबलू कटरे यांनी लावला आहे.
5 किलोमीटरच्या कामात अभि इंजिनिअरिंग ने महाजेनकोच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन हा घोळ केला आहे, प्रशासनाने तात्काळ अभि इंजिनिअरिंग वर कारवाई करून त्यांचेकडून पेनॉलटी वसूल करावी व त्यांचे बिल थांबविण्यात यावे अशी मागणी बबलू कटरे यांनी केली आहे.
अभि इंजिनिअरिंगने केला पाईपलाईन कामात घोळ – बबलू कटरे यांचा आरोप
Advertisements