स्वयंरोजगाराकरिता चहा स्टॉल व मुक्त पेपर वाचन स्टँडचे उदघाटन

0
205
Advertisements

तुळशीनगर (चंद्रपूर):-गेल्या दोन दशकापासून दिव्यांग हिताय व सुखायसाठी धडपडणाऱ्या विकलांग सेवा संस्था चंद्रपूरच्या वतीने दिव्यांग व्यक्ती श्री खुशाल ठलाल याला स्वयंरोजगार व आत्मनिर्भरता करीता चहा स्टॉल,वृत्तपत्र वाचन स्टँडचा शुभारंभ चंद्रपूर महानगर पालिकेच्या लोकप्रिय महापौर सौ.राखीताई कंचलावार यांचे हस्ते धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या निमित्य दिनांक १६ आकटोम्बरला हॉटेल ट्रायस्टार मागील तुळशीनगर प्रवेशदाराचे बाजूला राष्ट्रवादीनगर येथे करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या वार्डातच नव्हे सर्वांसाठी व जनविकासासाठी सदैव उपलब्ध व तत्पर असलेले नगरसेवक श्री सुभाषभाऊ कासनगोट्टूवार, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव पत्रकार श्री.प्रशांत विघ्नेश्वर ,प्रसाद पान्हेरकर,देवराव कोंडेकर यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी महापौर राखीताई कंचलावार यांनी या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्या देऊन कौतुक व अभिनंदन केले.मान्यवरांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाचे व तुकुमचे जेष्ठ नागरिक भोलाराम सोनूले वीज केंद्रातील विठ्ठल शेंडे यांची उपस्थिती लाभली होती. लोकसहभागातून दिव्यांग आत्मनिर्भर उपक्रमाला सर्वश्री संजय रोडे,डॉ आशीष सातव,श्री अनिल आष्टीकर आल्हाद काशीकर, वर्षा कोठेकर, कृतिका सोनटक्के यांच्या दातृत्वाबद्दल महापौर सौ राखी कंचलावार यांनी विशेष गौरवोद्गार व कौतुक केले.चंद्रपुरातील अबोली संस्थेच्या कार्यकर्त्या सौ वनश्री यांनी या विधायक कार्याला भरीव आर्थिक मदत दिल्याबद्दल तसेच त्यानी कोरोनाला यशस्वी लढा दिल्याबद्दल कोरोना योद्धा म्हणून त्यांचा महापौर ह्यांचे शुभहस्ते वृक्ष रोपटे व ग्रंथ देऊन त्याचा व समाजकार्यातील योगदानाबद्दल सौ संगीता चव्हाण ह्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पूजा पान्हेरकर,अशोक खाडे, खुशाल ठलाल, संगीता चौहान,सीमा वनकर यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम पान्हेरकर यांनी केले तर आभार प्रा.प्राजक्ता वासेकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here