देशी दारूसह बारा लाखाचा मुद्देमाल जप्त

0
1047
Advertisements

भद्रावती/ अब्बास अजानी

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या आदेशानुसार भद्रावती पोलिसांनी सुरू केलेल्या धडक कारवाईत दि.16 आणि 17 ऑक्टोबर रोजी देशी दारूसाठ्यासह 12 लाख 48 हजार 200 रूपयांच्या मुद्देमाल जप्त केला.
पोलिससुञांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रावती येथील एम आय डि सी रोडवरील पुर्णा सेल्स अॅन्ड सर्विस या दुकानात अवैधरित्या देशी दारूच्या साठा केलेला आहे. अशी गुप्त माहिती भद्रावती पोलिससांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुर्णा सेल्स अॅन्ड सर्विस या दुकानात दि.16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.45 वाजता धाड टाकली असता प्लास्टिकच्या 9 पिशव्यामध्ये 90 मी.लि. मापाच्या राकेट संञा देशी दारूच्या 2700 निपा आढळून आल्या. या निपांची किंमत 2 लाख 70 हजार रूपये आहे. तसेच 21 हजार रूपये किमतिचे मोबाईल हॅन्डसेट आरोपींकडुन करून जप्त करण्यात आले. अशा प्रकारे 2 लाख 91 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी मध्ये अर्जुनसिंग प्रेम सिंग जुनी वय(24) रा.वडनेर जिल्हा वर्धा, अभिजीत पांडुरंग सुरशे वय (35) रा.राजुर काॅलरी वणी जि. यवतमाळ, गजानन शंकर गोहने वय (42) रा. श्रीराम नगर भद्रावती जि. चंद्रपुर, सुंदर रुपचंद वर्मा वय (41) रा. नविन सुमठाना भद्रावती जि. चंद्रपुर यांचा समावेश आहे. या सर्व आरोपी वर दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
तसेच 17 ऑक्टोबर च्या पहाटे 2.30 वाजताचे दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून भद्रावती येथील टप्पा चौकात नाका बंदि केली असता. एम. एच. 08 सी.8703 क्रमांकाचा वर्णा कारची झडती घेतली असता. कारमध्ये 2 लाख 50 रूपये किमतीच्या देशी दारूच्या निपा आढळून आल्या.
सदर कारचा चालकाने पोलिसांची नाका बंदि पाहुन आपले वाहन कर्नाटक एम्टा कंपनीचा कच्चा रस्त्याने पलटवुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु काही अंतरावर कारचा समोरचा डाव्या बाजूचा टायर फुटला. त्यामुळे कार चालकने कार सोडून पोबारा केला. यावेळी 7 हजार 200 रूपये किमतीची हायवर्ड प्रकारची दारू आणि 7 लाख रूपये किमतीची वर्णा कार असा एकुण 9 लाख 57 हजार 200 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे, यांचा मार्गदर्शनात भद्रावती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिल सिंग पवार, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अमोल तुडजेवार, पोलिस शिपाई केशव चिटगिरे, हेमराज प्रधान, निकेश ढेंगे, शशांक बदामवार, यांनी केली. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे चंद्रपुरला रूजु झाल्यापासून भद्रावती शहरात अवैध दारू विक्रेत्यानविरूध्द पोलिसांनी धडक मोहीम चालु केली असुन अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here