अरेच्चा गोंधळात गोंधळ…..!

0
343
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषद मार्फत शहरात नाली व रोडची कामे होणार असल्याने “ई निविदा” प्रसिद्ध करून उघडल्याची माहिती आहे.सदरची कामे आपले नातेवाईक व हितचिंतकांना मिळावी यासाठी विकासाची धडपड असणाऱ्या काही सत्ताधाऱ्यांनी व्यवस्थितरीत्या फिल्डींग लावली आहे.मात्र यासाठी काही बाहेरच्या लोकांनी सुद्धा ई-निविदा भरल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.सदरचे काम आपल्या नातेवाईक व हितचिंतकांनाच कसे मिळतील यासाठीचे प्रयत्न युद्धपातळीवर करत असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर यांच्याच एका हितचिंतकांनी दिली आहे.
बाहेरच्या व्यक्तींनी कमी दरात निविदा भरल्याने यांचे धाबे दणाणले असून सदरचे काम आपल्या हातून जाण्याच्या भीतीपोटी काही सत्ताधाऱ्यांनी कमालीची शक्कल लढवत कमी दर असलेल्या निविदा धारकांना हाताशी धरले व त्यांच्याकडून निविदा उघडण्यापूर्वी “मी ई-निविदा प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे पत्र न.प.ला आणून दिले” यात बाहेरच्यांची ई-निविदा माघार घेऊन आपले नातेवाईक व हितचिंतकांनाच देण्याचा बेत आखला गेला.परंतु मुख्याधिकाऱ्यांनी नियमांवर बोट ठेवत सदरचे पत्र विचारात न घेता निविदा उघडून यांचा बेत हाणून पाडला अशी माहिती सुद्धा मिळाली आहे.येणाऱ्या स्थायी समितीत निविदाचे दर निश्चित होणार आहे.परंतू सदरची कामे कमी दरांच्या निविदा धारकास न देता सभेत रद्द करून फेर निविदा काढून पुढे आपल्याच व्यक्तींना कामे मिळावी यासाठी ही मंडळी पुन्हा दुसरी शक्कल लढविण्याच्या बेतात असल्याचे कळते.हे जर खरे असेल तर न.प.ला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आणि शहरातील विकास कामांना विलंब होणार.एकंदरीत समस्त घडामोडी लक्षात घेतले तर नगरपरिषदेत सावळागोंधळ सुरू असल्याची शंका येते. आता आगामी स्थायी समितीत याविषयी काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here