शाळा कधी सुरु होणार? उपमुख्यमंत्री पवार यांचे शाळा सुरु करण्याबाबत महत्वाचे विधान

0
1078
Advertisements

चंद्रपूर – शाळा सुरु होणार कि नाही असा प्रश्न पालक व विद्यार्थी यांना पडलेला आहे, याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे.

दिवाळीपूर्वी शाळा सुरु होणार नाही अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली आहे, कारण डिसेम्बर व जानेवारी महिण्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, दिवाळी नंतर सुद्धा परिस्थीचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेऊ, काही राज्यांनी शाळा सुरु करण्याचा प्रयोग सुद्धा केला परंतु विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने शाळा तात्काळ बंद कराव्या लागल्या म्हणून महाराष्ट्रात सध्या कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेऊ असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here