चंद्रपूर – 29 सप्टेंबरला चंद्रपुरातील कांग्रेसचे युवा नेते मनोज अधिकारी यांची सिनर्जी वर्ल्ड येथे निर्घृण हत्या करण्यात आली होती.
त्यांच्या हत्येनंतर शहरात तणावाचे वातावरण होते, दाताला परिसरातील सर्वात मोठे निवासी परिसर म्हणजे सिनर्जी वर्ल्ड या वसाहतीत मनोज अधिकारी यांचा फ्लॅट होता, विशेष म्हणजे हाय प्रोफाइल असलेल्या या सिनर्जी वर्ल्ड मध्ये एकही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता ज्यामुळे पोलिसांना सुद्धा तपासात समस्या निर्माण झाली होती.
सध्या या परिसरात 80 कुटुंब वास्तव्यास आहे व शिफ्टनुसार सध्या 3 सुरक्षारक्षक आहे.
जर सीसीटीव्ही त्या परिसरात असते तर हत्येआधी मनोज अधिकारी कुणासोबत आले व नेमकं झालं काय याबाबत उलगडा लवकर झाला असता.
अधिकारी यांच्या हत्येनंतर तब्बल 2 आठवड्यानंतर सिनर्जी वर्ल्ड येथे कॅमेरे लावण्यात आले.
सध्या या प्रकरणात 3 आरोपी अटकेत आहे व 1 महिला आरोपी अजूनही पोलिसांच्या अटकेबाहेर आहे.
अधिकारी यांच्या हत्येनंतर सिनर्जी वर्ल्ड परिसरात लागले सीसीटीव्ही कॅमेरे
Advertisements