गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
जिवती नगरपंचायतने मागील 31जानेवारी 2020 ला आर.एस.आर.इन्फ्राटेक या संस्थेला घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट दिले आहे.ते काम करारनाम्याच्या अटी-शर्ती प्रमाणे होत नाही.त्यामुळे जिवती शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.याठिकाणी सर्रासपणे शासनाच्या डोळ्यात धूळफेक सुरू असून ज्यासाठी करार केला गेला तो करारनामा केवळ कागदापुर्ताच सीमित आहे.असे आरोप करत जोपर्यंत या ठिकाणी होत असलेल्या घोळ प्रकरणी सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत देयक(बिल)देण्यात येऊ नये तसेच सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी,दोषी आढळल्यास सदर कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा अन्यथा येत्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा मनसे कोरपना तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी तहसीलदार जिवती यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.यामुळे गडचांदूर पाठोपाठ आता जिवती येथे ही घनकचरा प्रकरण पेटण्याची चिन्हे दिसत असून नगरविकास मंत्री,पालकमंत्री,जिल्हाधिकारी,नगर विकास शाखा अधिकारी,जिवती न.पं. मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.आता याविषयी काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिवती घनकचरा कंत्राटदाराची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय बिल देऊ नये
Advertisements