गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा 15 आक्टोंबर रोजी पार पडली.शासनाच्या निर्देशानुसार सभा व्हिडिओ काँफ्रंसींगद्वारे घेण्याचे ठरले होते.परंतू विरोधी पक्ष शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेता सागर ठाकूरवार व इतर नगरसेवकांनी कोरोना संबंधी सर्व नियमांचे पालण करून सभागृहच्या कार्यालयात सभा घेण्यासाठीची मागणी केल्याचे कळते. सभेत एकुण 16 विषय होते.यातील विषय क्रमांक 4 “गडचांदूर शहरातील महात्मा गांधी चौक,शिवाजी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळचे बाजूचे तसेच शेडमाके चौक,संविधान चौक,राजीव गांधी चौक,संताजी चौक, महात्मा फूले चौक या चौकांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करणे बाबत चर्चा विनिमय करून निर्णय घेणे” असा मजकूर होता.अनेकांचे श्रद्धा व आदरस्थानी असलेल्या महापुरुषांचा अशाप्रकारे एकेरी शब्दात नावाचा उल्लेख करणे कितपत योग्य हे आता तुम्हीच ठरवा.यावर विरोधी पक्ष नगरसेवक सभागृहात अक्रमक झाले आणि तुम्ही ज्या पद्धतीने विषय सुचित लिहिले ते चुकीचे आहे.अशा महापुरूषांचा एकेरी शब्दात उल्लेख अपमानजनक असून हे कृत्य कदापि खपवून घेतले जाणार नाही याबद्दल माफी मागा असे शिवसेना गटनेता सागर ठाकूरवार,धनंजय छाजेडसह भाजपच्या नगरसेवकांनी म्हटल्यावर मुख्याधिकाऱ्यांनी “माझ्याकडून अनावधानाने ही चुक झाली. याविषयी मी माफी मागते” अशाप्रकारे मुख्याधिकारी यांनी तसेच याबरोबर नगराध्यक्षांनी सभागृहात माफी मागितल्याचे विरोधी पक्ष नगरसेवकांनी म्हटले आहे.गेल्या तीन वर्षांत गडचांदूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी यांनी वयोवृद्ध प्रतिष्ठित डॉक्टर, पत्रकार,समाजसेवक,सामान्य नागरिकांवर अपमानजनक मुक्ताफळे उधळली.आता महापुरूषां विषयीचे हे प्रकरण नागरिकांत चर्चेचा विषय बनला आहे.सदर प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने विनाविलंब माफी मागून मोकळे झाल्याची चर्चा शहरात ठिकठिकाणी सुरू आहे.तक्रार करूनही काहीच उपयोग नाही पूर्वीप्रमाणेच आताही वरिष्ठांकडून दुर्लक्ष होणार याची खात्री असल्याने कदाचित विरोधी पक्ष नगरसेवकांनी सदर गंभीर प्रकरण सभागृहातच मिटवून धन्य झाल्याचे बोलले जात आहे.
थोर पुरुषांचा एकेरी शब्दात उल्लेख, विरोधी नगरसेवक आक्रमक
Advertisements