नवीन शेतीविषयक कायदे नको? घुग्घुस काँग्रेस तर्फे वेबीनार संमेलन संपन्न

0
60
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता  

घुग्घुस :- केंद्र शासनाने नव्याने निर्माण केलेल्या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती नष्ट होणार, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळणार नाही,आणि बाजारभाव ही मिळणार नाही, कामगार,मजूर, अडते,मुनीम,हमाल यांच्यासह लाखो लोक बेरोजगार होतील,बाजार व्यवस्था मोडीत निघाल्यामुळे राज्याच्या महसुलात घट होणार,राज्याचे उत्पन्न कमी होऊन त्याचा परिणाम ग्रामीण व शेती विकासावर होणार,शेतकऱ्यांना करार शेतीच्या नावाखाली फसवून त्याला त्याच्याच शेतात मजूर बनवले जाणार,यासह अनेक अडचणींना शेतकऱ्यांना दडपशाहीला बळी पडावे लागेल म्हणून केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी निर्माण करण्यात आलेल्या काळ्या कायद्याचा विरोध करण्यासाठी तसेच कामगार विरोधी बिलाचे निषेध व्यक्त करण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, मा.पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळु भाऊ धानोरकर तसेच जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष प्रकाश जी देवतळे यांच्या सूचनेनुसार घुग्घुस काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या तर्फे दुपारी 04 वाजता गांधी चौक घुग्घुस येथे शासकीय नियमांचे पालन करून शेतकरी बचाओ डिजिटल रॅलीचे आयोजन केले
या राज्यस्तरीय वेबीनार सम्मेलनात प्रदेश काँग्रेसचे सन्मानीय नेत्यांनी उपस्थित नागरिकांना नवीन शेती विषयक कायदे का नको ?
आहेत तसेच कामगार विरोधी बिलामुळे कामगारांवर होणाऱ्या अत्याचार व दडपशाही यावर मुद्देसूदपणे व अभ्यासपूर्ण रीत्या
आपले विचार मांडले या सम्मेलनात किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामरावजी बोबडे, मुन्ना भाई लोहानी, बाबा कुरेशी, युवक नेते सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, शेखर तंगडपल्ली, कल्याण सोदारी, बापूजी क्षीरसागर,युवा नेते सिनू गुडला,शहजाद शेख, सचिन कोंडावार, प्रेमानंद जोगी, योगेश ठाकरे, संजय कोवे, नुरूल सिद्दीकी, सचिन गोगला,राजू पोलं,सुरज बहुराशी, निखील पुनगंटी,शाहरुख शेख,देवानंद ठाकरे, सुनील पाटील, सौ.सरस्वती ताई पाटील, सौ. संगीताताई बोबडे, सौ. पदमा त्रिवेणी, श्रीमती दुर्गा पाटील, श्रीमती अमीना बेगम, व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here