राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात यावा – युवा सेनेची मागणी

0
222
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता 

घुगुस – दिनांक 15 ऑक्टोंबर रोज गुरुवार ग्रामपंचायत चे प्रशासक भानुसे साहेब यांना व मा. खासदार साहेब ,मा. आमदार साहेब ,मा. जिल्हाधिकारी साहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे व प्रशासक घुग्घूस याबाबत निवेदन दिले.

Advertisements

हिंदवी स्वराज्याच्या आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारत देशाचे राजे होते ज्यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी सदैव संघर्ष करणारे न्यायप्रिय तत्वनिष्ठ असे एकमेव राजे होते अशा त्या राजाची कीर्ती सदैव स्मरणार्थ रहावी यासाठी घुग्घूस येथील जनतेची व शिवसेनेची हि फार जुनी मागणी आहे.
करिता सदर मागणीचा विचार करून घुग्घूस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात यावा या मागणीला घेऊन घुगुस येथील शिवसेना पदाधिकारी
गणेश शेंडे शिवसेना उपतालुका प्रमुख , ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ धोंगडे, युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, शिवसेना शहर प्रमुख बंटी घोरपडे, युवा सेना शाखा घुगुस चेतन बोबडे, बाळू चिकनकर , माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर जी चिकनकर , अजय जोगी , योगेश भांदक्कर , महेश शेंडे , अमर कापटे, अमित बोबडे , हर्षल बजाईज ,अजय राय, व समस्त शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here