चंद्रपूर – रेतिघाटांचे लिलाव झाले नसल्याने जिल्ह्यात रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे, यावर शासनाने अजूनही नियंत्रण आणले नाही.
15 ऑक्टोम्बरला पद्मापुर परिसरातील तस्करांवर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर यांनी रेती भरलेल्या ट्रॅक्टर वर कारवाई केली, कारेकर यांनी ट्रॅक्टर चालकास विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही.
त्यामुळे ट्रॅक्टर जप्त करीत त्याला वनविभागाच्या कार्यालयात नेत होते, ट्रॅक्टर चालकाने याची माहिती अष्टभुजा निवासी 32 वर्षीय रविशंकर तिवारी यांना दिली.
तिवारी तात्काळ वडिलांसोबत गेले असता त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कारेकर यांना अश्लील शब्दात शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.
त्यानंतर जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर तिथून घेऊन गेले.
वनपरिक्षेत्र अधिकारी कारेकर यांनी याबाबत रामनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली.
पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजगुरू करीत आहे.
वाळू तस्करांचा माफियाराज वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसोबत धक्काबुक्की
Advertisements