आयुध निर्माणी वसाहतीत भरदिवसा पट्टेदार वाघाचे दर्शन

0
1194
Advertisements

भद्रावती/ अब्बास अजानी

येथील चांदा आयुध निर्माणीच्या वसाहतीत दि.१३ आॅक्टोंबर रोजी भरदुपारी पट्टेदार वाघाने दर्शन दिल्याने वसाहतीतील नागरिकांमध्ये भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.
वसाहतीतील सेक्टर पाच मध्ये केंद्रिय विद्यालयाजवळ सागाचे छोटेसे जंगल आहे.या जंगलात एक पट्टेदार वाघ ऐटीत चालत असताना काही नागरिकांना दिसून आला.त्यामुळे त्यांच्यात भितीयुक्त कुतूहल निर्माण झाले.काही हौशी नागरिकांनी त्याला आपल्या भ्रमणध्वनी संचाच्या कॅमे-यात कैद केले.हा भाग शहरालगतचा भाग असून याठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते.ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुनच आयुध निर्माणीचे जंगल असल्याने नेहमीच वसाहतीत वन्य प्राण्यांचा संचार असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here