महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मागणीला यश

0
501
Advertisements

चंद्रपूर – कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांचे हाल होत आहे, नवीन शासकीय नौकरी, खाजगी नौकरिवर बंदी असल्यामुळे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांन पुढे पेचाचे प्रसंग निर्माण झाले आहे, अश्यातच आयटीआय शिकाऊ उमेदवारांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसमोर आशेचा किरण निर्माण केला आहे.
चंद्रपूर जिल्हातील महावितरण आय.टी.आय. शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया तात्काळ राबवावी या मागणी साठी महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे शहरउपाध्यक्ष सुयोग धनवलकर यांच्या नेतृत्वात व मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ बालमवार यांच्या मार्गदर्शनाने सोमवारी महावितरण च्या अधिक्षक अभियंता मा.चिवंडे मॅडम यांना निवेदना मार्फत विनंती करण्यात आली होती. त्यावेळेस अधिक्षक अभियंता यांच्याशी चर्चे दरम्यान एक ते दोन दिवसातच या भरती प्रक्रियेचि जाहिरात वर्तमान पत्रात प्रकाशित करू असे आश्वासन मनविसेला देण्यात आले होते. या मागणीची महावितरणाने अवघ्या २४ तासात दखल घेत भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित केली. लवकरच याचा फायदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार असून या निर्णया मुळे आय.टी.आय च्या विध्यार्था मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
निवेदन देताना चंद्रपूर विधानसभा संघटक महेशभाऊ शास्त्रकार, जिल्हासचिव किशोरभाऊ मडगुरवार, मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीपभाऊ चंदनखेडे, शहर संघटक मनोजभाऊ तांबेकर,उपशहर संघटक अक्षय बल्लावार, चैतन्य सदाफळे, शहर उपाध्यक्ष मुकेश किरंगे, पोंभुर्णा तालुका अध्यक्ष आकाश तिरुपतीवार, पोंभूर्णा तालूका अध्यक्ष मनविसे आशिष नैताम, वर्षाताई बोंबले, राजेंद्र वर्मा, कैलास आगलावे, चेतन बुरडकर, संजयमामा गुंडूवार, सारंग सिंग, अक्षय बेलमपल्ली, धम्मशिल मोडक, जीवन गेडाम व इतर मनसैनीक मोठया संख्येने उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here